मराठ्यांनी 1 डिसेंबरला जल्लोषासाठी तयार रहावे- देवेंद्र फडणवीस

शिर्डी | येत्या पंधरा दिवसांत मराठा समाजाला आरक्षण देऊ. त्यामुळे 1 डिसेंबरला मराठा समाजाने जल्लोष करण्यासाठी तयार रहावे, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिशिंगणापूर येथे बोलताना दिलं आहे.

गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाज आरक्षणाची मागणी करत आहे. समितीने अहवालही सादर केला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळणारच आहे. हे आरक्षण देताना इतर समाजाच्या आरक्षणाला मात्र धक्का लागणार नाही, असं ते म्हणाले.

आम्ही ४ वर्षाच्या कालावधीत आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. गेल्या चार वर्षात शेतक-यांच्या खात्यामध्ये ५० हजार कोटी रुपयांची मदत थेट दिली आहे. प्रत्येक अडचणीमध्ये शेतक-यांच्या पाठीमागे आमचे सरकार आहे, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-ओवेसीसारख्या गद्दारांनी पाकिस्तानातून निवडणूक लढवावी!

-भारतासारख्या गरीब देशात जाऊन चूक केली; ‘या’ खेळाडूचं वादग्रस्त वक्तव्य

-जेएनयूमधील कंडोम मोजणाऱ्या भाजप आमदाराचा पत्ता कट!

-मुलीकडं एकटक पाहून डोळा मारणं महागात; तरुणाला 3 वर्षांची सक्तमजुरी

-राहुल गांधींविरोधात सावरकर कुटुंबियांची पोलिसांत धाव!