उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना, मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहुर्त ठरला?
मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची प्रकृती बिघडल्याचे वृत्त गुरूवारी समोर आले. शिंदे यांना डाॅक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे शिंदे यांचे सर्व प्रशासकीय दौरे रद्द करण्यात आले आहेत. तसेच शिंदे- शिवसेना यांच्यातील वादाची सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. त्यानंतर तासाभरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) हे मुंबईवरून दिल्लीला रवाना झाले आहेत.
मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल ही दिल्ली वारी आहे का ?, अशा चर्चांना उधाण आले आहे. फडणवीस यांचेही सर्व प्रशासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. फडणवीस हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा(Amit Shah) आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा(J.P Nadda) यांची भेट घेण्याची शक्यता आहे. तसेच या भेटीनंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाबाबत काय निर्णय होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उपमुख्यमंत्री हे सुनावणी पुढे ढकल्यानंतर एका तासात तातडीने दिल्लीत रवाना झाले आहेत. व्हीआयपी टर्मिनलने ते दिल्लीत दाखल झालेत. मुख्यमंत्री तातडीने दिल्लीला रवाना झाल्याने अनेक चर्चा रंगल्या आहेत. या दाैऱ्यात फडणवीसांची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक होऊ शकते.
दरम्यान, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री पदसाठी कोणा कोणाची वर्णी लागणार याचीही प्रतिक्षा सर्वांना लागली आहेत. मंत्रिमंडळ विस्तार 5 ऑगस्टला होणार होता, परंतु शिंदे गट आणि शिवसेना यांच्या वादातील सुनावणी न्यायालयाने पुढे ढकल्याने राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारही लांबण्याची शक्यता आहे.
थोडक्यात बातम्या-
‘मंगळसूत्र गळ्यात घातलं तर वाटतं पतीने गळाच पकडला आहे’-अमृता फडणवीस
मोठी बातमी! शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर
शिंदे सरकारवर सुप्रीम कोर्टाच्या निकालाची टांगती तलवार
संजय राऊतांच्या अडचणीत आणखी वाढ; ईडीच्या तपासात महत्त्वाची समोर
‘म्हसोबाला नाही बायको सटवायला नाही नवरा, अशी महाविकास आघाडीची अवस्था’, पडळकरांची टोलेबाजी
Comments are closed.