महाराष्ट्र मुंबई

काँग्रेस नेत्याचा कार्यक्रम…अन् मुख्यमंत्री फोडाफोडी राजकारणावर म्हणतात…

मुंबई | हल्ली कोण कोणत्या पक्षात आहे हे देखील कळत नाही. आम्हाला देखील माहित नसतं आमच्या पक्षात कोण येणार आहे. आम्हाला पेपरवाल्यांकडूनच दुसऱ्या दिवशी समजतं. त्यामुळे अलीकडच्या काळात कुणासोबत फोटो काढायलाही भीती वाटते, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणताच मंचावर आणि उपस्थितांमध्ये हशा पिकला.

माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या ‘विधानगाथा’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे एकाच मंचावर आले होते. यावेळी मुख्यमंत्री आणि पवारांच्यात चांगलीच टोलेबाजी पाहायला मिळाली.

देशाच्या संसदेने, राज्याच्या विधिमंडळाने याआधी अनेक अभ्यासपूर्ण भाषणे ऐकली आहेत. शेकाप नेते उद्धवराव पाटील, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस विषयाची चांगली तयारी करून मांडणी करत, सध्याचे मुख्यमंत्रीही अत्यंत अभ्यासपूर्वक मांडणी करतात, असं शरद पवार म्हणाले.

दरम्यान, हर्षवर्धन पाटील त्यांचा वारसा योग्यरीत्या चालवत आहेत, त्यांचे हे पुस्तक निश्चितच नव्या सदस्यांना प्रेरणा देणारे ठरेल, असा मला विश्वास पवारांनी व्यक्त केला तर विधान मंडळ कामकाजाचं ‘हँडबूक’ म्हणजेच ‘विधानगाथा’ हे पुस्तक आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

“पवारसाहेब… तरी मी म्हणत होतो, या नेत्याची पक्षातून हकालपट्टी करा!”

साताऱ्यानंतर सोलापूरातही काँग्रेस-राष्ट्रवादी धक्का बसणार???

सरपंचांसह उपसरपंचांना ‘अच्छे दिन’; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

आरक्षण नाही मात्र धनगर समाजासाठी सरकारची मोठी घोषणा!

वेल्हाचं नाव ‘राजगड’ करा; सुप्रिया सुळेंची आग्रही मागणी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या