पुणे महाराष्ट्र

उत्तम माणूस कसा घडवायचा हे तुकोबारायांनी शिकवलं- देवेंद्र फडणवीस

पुणे | ज्ञानोबारायांनी विश्व कल्याणाचा मंत्र दिला तर अध्यात्म आणि भौतिक जीवनाची सांगड घालून उत्तम माणूस कसा घडवायचा?, हे संत तुकोबारायांनी शिकविले, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ‘संतदर्शन चरित्र-ग्रंथा’चे प्रकाशन पुण्यात करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते.

आपली संतपरंपरा फार मोठी आहे. महाराष्ट्राच्या समाजमनात त्याचे प्रतिबिंब दिसून येते. महाराष्ट्रधर्म आणि मराठी विचार, मराठी संस्कृती समृद्ध होण्याचे मूळ हे या संतपरंपरेत आहे, असंही ते म्हणाले.

संत साहित्यातील तत्व, विचार, सत्य हे वास्तविकतेच्या आधारावर आणि आजच्या पिढीच्या परिस्थितीसापेक्ष मांडणे, ही काळाची गरज आहे, असंही त्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या–

-लोकशाही वाचवण्यासाठी इमान जिवंत ठेवा- शरद यादव

-पोलीस गणवेशावर टिळा, गंडा-दोरे नकोत; आयुक्तांचे आदेश

-संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीतील अश्वाचा मृत्यू!

-अमित शहा पुण्यातील भाजप कार्यकर्त्यांना शिकवणार चाणक्य नीती!

-यशवंत सिन्हांचा मुलावर हल्लाबोल; जयंत सिन्हांना म्हटले नालायक!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या