मुंबई | ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भाजपने राज्यातील सर्वच भागांमध्ये यश मिळवलं आहे. त्यामुळे या निवडणुकीत महाविकासआघाडीला मागे टाकून भाजपच सर्वात मोठा पक्ष ठरेल, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते.
राज्यात निसर्ग चक्रीवादळ आणि अतिवृष्टी झाली तेव्हा खूप घोषणा झाल्या. पण प्रत्यक्षात मदत काहीच मिळाली नाही. त्याचे परिणाम ग्रामपंचायत निवडणुकीत दिसून आला, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.
बिहार निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. त्यानंतर शिवसेनेला अक्कल आली पाहिजे होती. मात्र, आता पुन्हा ते पश्चिम बंगालमध्ये उमेदवार उभे करत आहेत. तेथेदेखील हीच गत होईल, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
किमान आतातरी शिवसेनेनं आपली इज्जत आपणच राखावी, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला लगावला आहे.
थोडक्यात बातम्या-
मला अपघातमुक्त महाराष्ट्र हवा आहे- उद्धव ठाकरे
आईविरोधात वडिलांचं पॅनल उभं करणाऱ्या पिशोरी ग्रामपंचायतीचा पाहा काय लागला निकाल!
पाटोद्यात पेरे पाटील हरले, हिवऱ्यात पोपटराव जिंकले; अण्णांच्या राळेगणमध्ये काय झालं?
कोरोनामुळं बायकोचं चुंबनही घेतलं नाही, मग…- फारूक अब्दुला
“राज्यातील सहा हजारपेक्षा अधिक ग्रामपंचायतींमध्ये कमळ फुलणार”