सचिन तेंडुलकर यांचा अपमान महाविकास आघाडीचे नेते सहन करणार का?- देवेंद्र फडणवीस
मुंबई | शेतकरी आंदोलनावर केलेल्या वक्तव्यामुळे भारताचा माजी दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकरवर टीका होत आहे. त्याचे चाहतेही त्याच्यावर नाराज झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिनवरून सरकारला सवाल केला आहे.
भारतरत्न आणि मराठी माणसाचे अभिमान असलेले सचिन तेंडुलकर यांचा असा अपमान महाविकास आघाडीचे नेते सहन करणार का?, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.
केरळ युवा काँग्रेसने सचिनच्या विरोधात त्याच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करताना त्याच्या पोस्टरला काळं फासलं. यासंदर्भातील फोटो सोशल माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.
दरम्यान, देशाच्या सार्वभौमत्वाशी कधीही तडजोड केली जाणार नाही. बाहेरच्या शक्तींनी याकडे दुरूनच पाहावं, अंतर्गत प्रकरणात हस्तक्षेप करु नये. भारतीयांना आमचा भारत चांगला माहिती आहे आणि आम्ही आमच्या देशाचं भलं जाणतो. चला देश म्हणून एकत्र येऊ या, असं सचिन तेंडुलकरने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं. त्यासोबतच त्याने #IndiaTogether आणि #IndiaAgainstPropaganda या दोन हॅशटॅगचा वापर केला होता.
केवळ महाराष्ट्राचे नाही, तर संपूर्ण देशाचे भूषण असलेले,
भारतरत्न आणि मराठी माणसाचे अभिमान असलेले सचिन तेंडूलकर यांचा असा अपमान महाविकास आघाडीचे नेते सहन करणार का ?@sachin_rt https://t.co/oEh9t4LzXp— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 5, 2021
थोडक्यात बातम्या-
महाविकास आघाडी सरकार संधीसाधू, त्यांना जनतेशी देणंघेणं नाही- गिरीष महाजन
“सचिनला भारतरत्न देणं चुकीचं, हा भारतरत्न या सन्मानाचा अपमान”
श्रीनिवास पाटील अन् उदयनराजे भोसले यांची दिल्लीत भेट!
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण
‘या’ माजी आमदाराचा भाजपला रामराम, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश
Comments are closed.