मुंबई | अंगात केवळ विदर्भाचं रक्त असून चालणार नाही तर विदर्भाशी प्रामाणिक राहा, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला.
प्रवीण दरेकर यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणाऱ्या ‘वर्षभराचा लेखाजोखा’ या पुस्तकाचं प्रकाशन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. त्यावेळी फडणवीस बोलत होते. उद्धव ठाकरे म्हणाले होते की आमच्यामध्ये विदर्भाचं रक्त आहे, यावरूनही फडणवीसांनी त्यांच्यावर निशाणा साधला.
‘आमच्यामध्ये विदर्भाचं रक्त आहे’, किमान हे म्हणण्याची तरी वेळ मुख्यमंत्र्यांवर आली याचं आम्हाला समाधान आहे. पण विदर्भाचं नुसतं रक्त असून चालणार नाही. कारण अनेक नेत्यांनी विदर्भाशी बेईमानी केली तशी बेईमानी तुम्ही करु नका, असं फडणवीस म्हणाले.
दरम्यान, विदर्भाच्या विकासासाठीची वैधानिक विकास मंडळाची काम बंद का झाली? असा सवालही त्यांनी फडणवीसांनी केला.
थोडक्यात बातम्या-
‘महाराजांचे कार्य संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी’; शिवनेरी किल्ल्यासाठी 23 कोटी मंजूर
“चहल मी लक्षात ठेवेल, शेवटी माझ्या लेकानेच मला महापालिका मुख्यालयात आणलं”
“मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तात्काळ राजीनामा द्यावा”
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी ठाकरे आहेत हे कर्नाटकच्या सरकारने आता विसरू नये- संजय राऊत
सेक्स करताना अतिउत्साह पडला महागात, तरूणाला गमवावा लागला आपला जीव!