बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय नेता व्हावं पण राष्ट्रवादीपेक्षा नाही, असं राऊतांना वाटतं”

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता असल्याचं वक्तव्य केलं आहे. राऊतांच्या या वक्तव्यावर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील राऊतांच्या यावर प्रतिक्रिया देत संजय राऊतांना टोला लगावला आहे.

माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रीय नेता व्हावं असं राऊतांना वाटत असेल तर ते चांगलंच आहे. मुख्यमंत्र्यांनी नक्की मोठा राष्ट्रीय नेता व्हावं पण राष्ट्रवादीपेक्षा मोठा नाही, असं राऊतांना वाटतं.

तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना फोन करुन शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्र्यांना जी संधी मिळाली आहे त्या संधीचं मुख्यमंत्र्यांनी सोनं करावं, असं देखील फडणवीस यांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना संजय राऊत म्हणाले होते की, उद्धव ठाकरे प्रत्येकाला आपले कुटुंब प्रमुख वाटतात. हे त्यांच्या नेतृत्वाचं यश असून घरातला माणूस नेतृत्व करतो, असं प्रत्येकाला वाटतं. हे नेतृत्व प्रदीर्घ काळ टिकेल. राष्ट्रालाही त्यांच्या संयमी, प्रखर राष्ट्रवादी आणि हिंदुत्वावादी नेतृत्वाची गरज आहे. ते देशाला नेतृत्व देतील, अशा शुभेच्छा मी त्यांना देतो.

थोडक्यात बातम्या –

…अन् तिने आपल्या मुलांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं, तळीयेतील माऊलीची शौर्यगाथा

‘ज्यांचा संबंध नाही त्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा टाळा’; शरद पवारांच्या आवाहनावर फडणवीस म्हणाले,’मी तर विरोधी पक्षनेता’

‘बाई पॅन्ट कुठे आहे?’; अभिनेत्री राधिका आपटे झाली ट्रोल

‘महाराष्ट्रातील नेता जर…’; उद्धव ठाकरेंकडे राष्ट्रीय स्तराचं नेतृत्त्व देण्याबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य

“राज्यपाल नेहमी घटनेचं पुस्तक वाचून काम करतात, पुस्तक पुरात वाहून गेलं का पाहावं लागेल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More