बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अन् चक्क डेव्हिड वार्नरने केला रोहित शर्मावर चोरीचा आरोप!

मुंबई | टी-20 विश्वचषक सराव सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा खेळला नाही. तरीही त्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वार्नरने चक्क रोहित शर्मावर चक्क चोरीचा आरोप लावला आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींना विश्वचषक स्पर्धेआधी धक्काच बसला आहे.

रोहित शर्माने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ अपलोड केला आहे. त्या व्हिडीओमध्ये विश्वचषकमधील जर्सी वेगळ्याच पद्धतीने परिधान करताना हॉटेलमध्ये दिसत आहे. ‘तु माझ्या टिक-टॉकची कॉपी करत आहेस, अशा वेगळ्याच अंदाजामध्ये डेव्हिड वार्नरने प्रतिक्रिया दिली आहे. डेव्हिड वार्नर सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. तो नेहमी सोशल मीडियावर व्हिडीओ अपलोड करत असतो. असाच एक व्हिडीओ रोहित शर्माने अपलोड केला होता.

रोहित शर्माने अपलोड केलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रंचड व्हायरल होत आहे. आतापर्यंत तो व्हिडीओ दहा लाखांपेक्षा जास्त लोकांनी पहायला आहे. तर सोळा लाखांपेक्षा अधिक लोकांनी त्या व्हिडीओला लाईक्स केलं आहे. या व्हिडीओवर भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवने देखील प्रतिक्रिया दिली आहे. डेव्हिड वार्नरच्या प्रतिक्रिया नंतर ‘किती सुंदर’? असं कुलदिप यादव म्हणाला आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय टी-20 विश्वचषक स्पर्धेला सुरूवात झाली आहे. सोमवारी सराव सामन्यात भारताने इंग्लड संघावर दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर भारताचा प्रतिस्पर्धी संघ पाकिस्तानविरूद्ध 24 ऑक्टोबर रोजी सामना खेळला जाणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rohit Sharma (@rohitsharma45)

थोडक्यात बातम्या-

‘तुम्ही पेट्रोल मला द्या ना…’, पेट्रोलपंपावर गायलेल्या गाण्याचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

‘या’ वर्षीही भेटणार वाहतूक करात सवलत?; ठाकरे सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

विमानाचा रंग पांढराच का असतो?, ‘हे’ आहे त्यामागचं विशेष कारण

पुणेकरांनो पाणी जपून वापरा! ‘या’ दिवशी राहणार पाणीपुरवठा पुर्णपणे बंद

धावत्या रेल्वेतून गरोदर महिला पडली खाली, देवदूतासारखा धावून आला RPF जवान, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More