मुंबई | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं नवं गाणं नुकतंच रिलीज झालं आहे. हे गाणं सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालंय. ‘ये नयन डरे डरे’ असं अमृता फडणवीस यांच्या नव्या गाण्याचं नाव आहे. मात्र या गाण्यावरून अमृता फडणवीस यांना ट्रोल केलं जात आहे. अमृता फडणवीस यांना ट्रोल करणाऱ्यांना त्यांचे पती देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
अमृता फडणवीस यांना शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ट्रोल करतात. स्त्री दाक्षिण्यासारख्या गोष्टी या तिन्ही पक्षांसाठी फक्त भाषणात बोलायच्या गोष्टी आहेत, असं म्हणत फडणवीसांनी ट्रोलर्सला प्रत्युत्तर दिलंय. ते मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी पूजा चव्हाण प्रकरणावर भाष्य केलं.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण राज्य सरकार आणि पोलिस दाबण्याचा प्रयत्न करत आहेत, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
दरम्यान, पूजा चव्हाणने खरंच आत्महत्या केली का? की तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्यात आलं?, व्हायरल झालेल्या क्लिप्समध्ये कोणाचा आवाज आहे?, असे अनेक प्रश्न यावेळी देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केले.
थोडक्यात बातम्या-
मित्राच्या लग्नात तो बनला मोर; ‘नाच रे मोरा आंब्याच्या बनात’ डान्स व्हायरल
पुन्हा लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
“हिंमत असेल तर पाकिस्तान बांगलादेशमध्ये सत्ता स्थापन करून दाखवा”
“एखाद्या हत्येची आत्महत्या करण्यात हे सरकार माहीर आहे”