Top News महाराष्ट्र सोलापूर

भेटी लागे जिवा… विठुराया आणि भक्ताच्या ‘या’ भेटीनं साऱ्यांचे डोळे पाणावले!

Photo- Facebook/Vithal Mandir

पंढरपूर |  ‘भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी’, आणि अजूनही अश्याच भक्तांना दर्शन देण्यासाठी गेली अठ्ठावीस युगे विटेवर उभ्या असलेल्या विठु-माऊलींच्या दर्शनाची इच्छा व्यक्त करत एक भक्त विठ्ठलनगरीत आला. ही भेट जेव्हा झाली तेव्हा उपस्थितांचे डोळे पाणावल्याशिवाय राहिले नाही.

सोलापूरमधील डॉ. राजाराम ज्ञानेश्वर होमकर यांना अल्झायमर नावाचा आजार आहे. ह्या आजारामुळे त्यांना शरीराच्या कोणत्याही अवयवाची हालचाल करता येत नाही. त्यांची प्रकृती चार वर्षांपासून तशीच असल्याने डॉ. राजाराम होमकर संपूर्णपणे झोपून आहेत. ते विठ्ठलाचे मोठे भक्त असल्याने त्यांनी विठुमाऊलींच्या दर्शनाची इच्छा कुटुंबाला सांगितली होती.

या विठ्ठल भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी होमकर कुटुंब आणि जवळच्या मित्रांनी रुग्णवाहिकेतून त्यांना पंढरपुरात आणले. शरीराची हालचाल होत नसल्याने त्यांना मंदिराच्या आत स्ट्रेचरसह प्रवेश देऊन आपल्या विठुमाऊलींचे दर्शन घेता आले. विठुरायांचे दर्शन घेताना होमकरांच्या डोळ्यात आनंदाश्रू आणि चेहऱ्यावर समाधान होते. विठ्ठल मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी यासाठी मोलाचे सहकार्य केले.

होमकर कुटुंबियांना दर्शनानंतर एक नवी उमेद मिळाली आहे. स्ट्रेचरवर आलेला डॉक्टर तरुण लवकरच स्वतःच्या पायावर चालत येईल, असा विश्वास मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी होमकर कुटुंबियांना दिला. परत जाताना ‘विटेवरी उभा विठ्ठला, तुला डोळे भरुनी पाहिला’ अशी भावना डॉक्टर होमकरांच्या मनात होती.

थोडक्यात बातम्या-

आयपीएलच्या लिलावाआधी मोठी घोषणा, ‘या’ सघानं घेतला नाव बदलण्याचा निर्णय!

रस्ते वाहतूक मंत्रालयाची मोठी घोषणा, ‘त्या’ वाहनचालकांना आता थेट मिळणार वाहन परवाना!

ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘जिवेत् शरद: शतम् योजना’; नेमकी काय आहे ही योजना???

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण: संजय राठोडांकडून मंत्रिपदाचा राजीनामा?

प्यार किया तो डरना क्या?, ‘त्या’ दोघींनी त्याची चक्क वाटणी करुन घेतली

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या