Top News देश

गुजरातच्या मंदिरांमध्ये भाविकांना ‘साष्टांग नमस्कार’ घालण्याची परवानगी नाही तर…

अहमदाबाद | कोरोना संसर्ग रोगामुळे अनेक नियम बदले असून, गुजरातमधील मंदिरांमध्ये देव दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी ‘साष्टांग नमस्कार’ घालण्याची परवानगी नाही. भाविक भक्त हात जोडून नमस्कार करू शकतात, असं प्रसिद्ध सोमनाथ मंदिराचे व्यवस्थापक विजयसिंह चावडा यांनी सांगितलं आहे.

चावडा म्हणाले की, “सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार साष्टांग नमस्कार करण्यास परवानगी नाही. प्रमाणित कार्यप्रणाली अंतर्गत भाविकांना काहीही स्पर्श करण्याची परवानगी नाही. लोकांना केवळ दर्शनासाठी मंदिराच्या गर्भगृहात जाण्याची परवानगी आहे.”

याचबरोबर, कोणत्याही भाविकाला दिवसातून तीन वेळा होणाऱ्या आरतीसाठी मंदिरात प्रवेश दिला जात नाही किंवा पाचपेक्षा अधिक भाविकांना एकावेळी बसून पूजा करण्याची परवानगी नाही.

तसंच, या व्यतिरिक्त राज्य सरकारच्या प्रमाणित कार्यप्रणालीनुसार मंदिरात नैवेद्य आणण्यास सुद्धा परवानगी दिली जात नसल्याचही चावडा यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

कोरोना लसीकरणाबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केलं मोठं वक्तव्य म्हणाले…

पुणे जिल्ह्यासाठी ‘इतक्या’ कोरोना लसीच्या डोसची गरज- डाॅ. राजेश देशमुख

“हा संघर्ष शेतकरी-कामगार विरोधी कायदे संपेपर्यंत सुरुच राहील”

महापालिकेकडून आरोप होत असताना सोनू सूदने घेतली शरद पवारांची भेट, चर्चांणा उधाण!

“ब्लॅकमेलशिवाय मुंडे आणखी काय बोलणार?, पण मी मरेपर्यंत लढेन”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या