बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ABVPच्या कार्यकर्त्याच्या कंपनीकडे DGIPRच्या सोशल मीडिया कॅम्पेनची जबाबदारी!

मुंबई | राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचें सोशल मीडिया सांभाळण्याचे काम ABVPच्या कार्यकर्त्याच्या कंपनीकडे असल्याचा प्रकार समोर आला आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतरही ही कामं त्यांच्याकडेच राहिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप-शिवसेनेचं सरकार विराजमान असताना राज्याच्या विविध विभागांच्या सोशल मीडिया खात्यांची जबाबदारी भाजप तसेच त्यांच्यांशी संलग्न संस्थाच्या कार्यकर्त्यांना देण्यात आल्याचा आरोप झाला होता, सरकार बदललं असलं तरी या कंपन्यांची कामं तशीच सुरु असल्याचं दिसत आहे.

Maharashtra DGIPRनं सोशल मीडियावर कोविडसंदर्भात कॅम्पेन सुरु केलं आहे. हे कॅम्पेन Pactic Media Concept या कंपनीकडून चालवलं जात आहे. अधिक माहिती घेतली असता ही कंपनी निखील करमपुरी यांची असल्याचं दिसून येत आहे. ते ABVPचे सक्रीय सभासद असल्याचं त्यांच्या सोशल मीडियावरील खात्यांवरुन दिसत आहे. मध्यंतरी राज्य निवडणूक आयोगाच्या सोशल मीडियाचं काम भाजयुमो आयटी सेल संयोजक देवांग दवे यांना देण्यात आल्यानं मोठा वाद निर्माण झाला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

शिवसेनेनं केलेला हा धोका भाजपशी नव्हे, तर…- जे. पी. नड्डा

“रिपब्लिक चॅनेलच्या अर्णब गोस्वामींना अटक करा”

“महाराष्ट्राच्या जनतेला देवेंद्र फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्री बनलेलं पाहायचंय”

“राजेंना राज्यसभेवर घेतलं पण प्रकाश आंबेडकरांना स्वीकृत नगरसेवक म्हणूनही घेणार नाही”

‘रिपब्लिक’कडून TRPचा खेळ?; दोन मराठी चॅनेल मालकांनाही अटक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More