Top News देश

…म्हणून या बड्या पोलीस अधिकाऱ्यानं दिला राजीनामा, आता शेती करणार!

Photo Credit - twitter account/Vishnu Rao

झारखंड | झारखंडचे महासंचालक पद सांभाळणारे एमवी राव यांनी आयपीएसची नोकरी सोडायचा निर्णय घेतला आहे. त्यांनी स्वेच्छासेवा निवृत्तीचा निर्णय घेतल्याने  सगळ्यांनाच प्रश्न पडला. मुळचे आंध्र प्रदेशातील विजयवाड्याचे एमवी राव आता वडिलोपार्जित शेती करणार आहेत.

11 महिने एमवी राव राज्याच्या पोलीस विभागाचे प्रमुख म्हणून काम पाहत होते. आपल्या कामगिरीमुळे झारखंडमध्ये नेहमीच चर्चेत राहणारे आयपीएस अधिकारी एमवी राव डीजीपी होते. या वर्षी सप्टेंबर महिन्यात ते सेवानिवृत्त होणार होते. तत्पुर्वीच त्यांना पदावरुन हटवण्यात आलं त्यांच्या जागी नीरज सिन्हा यांना पदभार सोपवण्यात आला आहे.

13 नोव्हेंबर 2017 रोजी एमवी राव यांना एडीजी सीआयडीचा पदभार सोपवला होता. त्यावेळी त्यांनी बहुचर्चित बकोरिया एन्काउंटर तपासाला चांगलाच वेग आणला होता. त्यानंतर ते काही राजकीय वादामध्ये अडकले आणि त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. झारखंडच्या आधी बिहारच्या जहानाबादमध्ये एएसपी ते झारखंडचे डीजीपी असा त्यांचा प्रवास राहिला आहे.

दरम्यान, राव यांनी 34 वर्षाच्या कार्यकाळात बिहार ते झारखंडच्या विविध सरकारामध्ये महत्वाचा पदभार सांभाळला होता. त्यांना पदावरुन हटवण्यात आल्यामुळे एमवी राव नाराज झाले. त्यानंतर त्यांनी सहा महिन्याचा कार्यकाळ बाकी असतानाच स्वेच्छासेवा निवृत्तीचा निर्णय घेतला.

थोडक्यात बातम्या

ज्युनिअर तेंडुलकरवर ‘हे’ तीन संघ लावणार बोली?

आई-वडिल घरात नसताना पाच वर्षाच्या चिमुरडीसोबत नराधमाने केलं ‘हे’ धक्कादायक कृत्य!

‘ये नयन डरे डरे’; अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं प्रदर्शित, पाहा व्हीडिओ

‘एका निशस्त्र तरुणीला बंदुकीवाले घाबरले’; दिशा रवीच्या अटकेनंतर प्रियंका गांधी संतापल्या

140 किलो वजनाचा गोलंदाज सगळ्या बांगलादेशला पुरुन उरला, लावला धक्कादायक निकाल!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या