Top News देश राजकारण

“पंतप्रधान मोदी आणि नितीश कुमार हेच बिहारच्या पराभवाचे वाटेकरी”

नवी दिल्ली | आज बिहारमधील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या निवडणूकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. अवघ्या काही तासांमध्ये निकाल स्पष्ट होणार आहे.

दरम्यान या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून भाजपवर सातत्याने टीका होत होत्या. त्यातच आता शिवसेना खासदार धैर्यशील माने यांनी देखील भाजपवर निशाणा साधलाय.

दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, “बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांचा पराभव होणार आहे. आणि या पराभवचे वाटेकरी नितीश आणि मोदीच असणार आहेत.”

माने पुढे म्हणाले, “आता महाराष्ट्रातून बिहारमध्ये परिवर्तनची लाट गेली आहे. तेजस्वी यादव यांच्या रूपाने बिहारमध्ये परिवर्तन आलं आहे. त्यामुळे आता संपुर्ण देशात परिवर्तन येणार आहे.”

महत्वाच्या बातम्या-

पंतप्रधान मोदींविरोधात वाईट उद्गार काढू नका; तेजस्वी यादव यांचा नेत्यांना इशारा

बिहारमध्ये भाजपचा काँग्रेसला दे धक्का, दुपट्टीने जागांवर आघाडी

बिहारमध्ये तेजस्वी पर्व सुरु होईल- संजय राऊत

मतमोजणीला सुरुवात; कोणाच्या डोक्यावर चढणार मुख्यमंत्री पदाचा मुकुट?

बिहार निवडणूक निकाल- प्राथमिक फेऱ्यांमध्ये महाआघाडी आघाडीवर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या