कोल्हापूर | हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ज्यांनी राजू शेट्टींना पराभवाची धूळ चाखायला लावली असे शिवसेनेचे धैर्यशील माने हे राजू शेट्टींच्या घरी आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचले.
धैर्यशील माने यांनी कार्यकर्त्यांसह राजू शेंट्टीच्या घरी जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. राजू शेट्टींच्या आईने धैर्यशील मानेंच औक्षण करत त्याचं स्वागत केलं.
धैर्यशील माने यांनी राजू शेट्टींच्या आईचे चरण स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घेतला. त्यांच्या आईनेही मायेनं धैर्यशील माने यांच्या डोक्यावरून हात फिरवून त्यांना आशीर्वाद दिला.
माझा लेक सर्वांना धरून आहे तसं तुम्हीही लोकांना धरून रहा, लोकांना साभांळा, असा आशीर्वाद राजू शेट्टींच्या आईने धैर्यशील माने यांना दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
-“राममंदिराबाबत न्यायालयाने पुरावे चिवडीत बसू नये; जनादेश मानायला हवा”
-भाजपात जाण्याच्या चर्चांवर विश्वजीत कदम म्हणतात…
-लोकसभेचा निकाल म्हणजे जनतेने राम मंदिराच्या बाजूने दिलेला कौल- उद्धव ठाकरे
-काँग्रेसला मोठं खिंडार पडणार?? हे दोन नेते भाजपच्या वाटेवर??
-काँग्रेस पक्षाशी आता माझा काहीही संबंध नाही- राधाकृष्ण विखे पाटील
Comments are closed.