महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 सांगली

भर पावसात धैर्यशील माने बोलत होते अन् श्रोते मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते!

सांगली | शिवसेनेचे हातकणंगले मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने हे इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात गौरव नायकवडी यांच्या प्रचारसाठी गेले होते. वरून धो-धो पाऊस पडत होता. अशात धैर्यशील माने भाषण करत होते. अन् समोर बसलेला जनसमुदाय त्यांना मंत्रमुग्ध होऊन ऐकत होता.

धैर्यशील माने यांच्या डोक्यावर छत्री धरण्याचा कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला पण त्यांनी त्याला नकार दिला. माने स्वत: पावसात उभं राहून भाषण करत आहेत. हे पाहिल्यावर कुणीही व्यासपीठावरून हललं नाही. आणि समोर बसलेले प्रेक्षकही पावसाची तमा न बाळगता त्यांना ऐकत होते.

विधानसभा निवडणुकीत सगळेच राजकीय पक्ष आपआपल्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी अतोनात प्रयत्न करत आहेत. आघाडी असो की युती सगळेच नेते  जोमाने पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारात उतरले आहेत.

दरम्यान, भरपावसात धैर्यशील मानेंनी केलेल्या भाषणाची जोरदार चर्चा इस्लामपूरमध्ये होत आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर गौरव नायकवडी यांनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडला. त्यातल्या मानेंच्या भाषणाने लक्ष वेधून घेतलं. त्यांच्या भाषणाची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.

 

महतवाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या