कोल्हापूर | कुठला अंगारा, कुठला बाबा यांच्याकडे आहे माहित नाही, हे पुन्हा मंत्री झाले. पण हे मंत्रिपद दोन-चार महिन्यांच्यावर टिकणार नाही, असं म्हणत कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय महाडिक आणि सतेज पाटील यांच्यातील वाद सर्वश्रूत आहे. महाडिकांनी पुन्हा एकदा नाव न घेता सतेज पाटलांवर निशाणा साधला आहे. हे मंत्री झाले, पण यांचं मंत्रिपद जास्त काळ टिकणार नाही, असं म्हणत त्यांनी टीका केली आहे.
नशीब आहे, हे मंत्री झाले. मंत्री झाले हे ठिक आहे. पण त्यांना चांगली कामं करता येण्यासारखी असताना मंत्रिपदाची शपथ घेतल्या घेतल्या यांच्या कार्यकर्त्यांनी उद्योग सुरु केले आहेत, अशी टीका महाडिकांनी केली आहे.
आमच्या कार्यकर्त्यांच्या घरावर दगडे मारणे, केबल कापणे, महिला अधिकाऱ्यांना धमकावणे, दरडावणे, रडवणे…मला या चमच्यांना सांगायचं आहे. जास्त उड्या मारु नका, दोन-तीन महिन्यात यांचं मंत्रिपद जाणार आहे, असं महाडिक म्हणाले आहेत.
ट्रेंडिंग बातम्या-
धर्मामुळे माणूस राक्षस नाही तर देव होण्याच्या मार्गाने जातो- मोहन भागवत
शेतकरी कर्जमाफी म्हणजे तात्पुरती मलमपट्टी- देवेंद्र फडणवीस
महत्वाच्या बातम्या-
परभणीच्या सर्वसामान्य तरुणासोबत शरद पवारांच्या दिलखुलास गप्पा; व्हिडीओ व्हायरल
परभणीच्या सर्वसामान्य तरुणासोबत शरद पवारांच्या दिलखुलास गप्पा; व्हिडीओ व्हायरल
महाराज भागवत कथा सांगायला गावात आला; अन् विवाहितेला घेऊन पळाला!
Comments are closed.