सत्तेची मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही- धनंजय मुंडे

बीड | सत्तेची मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर टीकास्त्र सोडलं. ते बीडमध्ये बोलत होते.

शिवाजीराव पंडित हे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेतृत्व आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा हे अतिशय दुर्दैवी आहे. सत्ता डोक्यात गेल्याचं हे द्योतक आहे. बीडची जनता ही सत्तेची मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही, असं धनंजय मुंडे म्हणाल. 

दरम्यान, बीड जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी शिवाजीराव पंडित यांच्यासह आमदार अमरसिंह पंडित यांच्यावर गुन्हा दाखल झालाय.