त्या नराधमावर कारवाई होईपर्यंत तुमचा हा भाऊ स्वस्थ बसणार नाही- धनंजय मुंडे

पुणे | आमच्या भगिनींवर अत्याचार करणार्‍या आरोपींवर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत हा भाऊ स्वस्थ बसणार नाही, अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज हिंजवडी येथील पिडीत मुलींच्या कुटुंबियांना धीर दिला.

 हिंजवडी परिसरात राहणार्‍या एका बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगाराच्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेमुळे समाजात अतिशय संतप्त प्रतिक्रिया उमटत असुन आज मुंडे यांनी हिंजवडी येथे त्या पिडीत मुलींच्या कुटुंबियांची भेट घेवुन त्यांना धीर दिला. 

दरम्यान, आगामी अधिवेशनातही कायदा व सुव्यवस्थेचा तसेच ऊसतोड कामगारांचे प्रश्न, अडचणी, त्यांच्या समस्या या विषयी मी सरकारला जाब विचारणार आहे, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-अमित शहा यांच्या जीवाला धोका; सुरक्षेत मोठी वाढ

-तारिक अन्वरांचा राजीनामा चुकीचा; त्यांनी शरद पवारांना विचारायला हवं होतं!

-कोरेगाव भीमा प्रकरणात पुणे पोलिसांची भूमिका योग्यच- मुख्यमंत्री

-प्रत्येक पक्षात कोण येतं-कोण जातं, याचा अर्थ पक्ष संपत नाही- प्रफुल्ल पटेल

-त्यांनी मला कपडे काढण्यास सांगितलं होतं- तनुश्री दत्ता

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या