Santosh Deshmukh l बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबरला हत्या करण्यात आली. मात्र या घटनेने राज्यभर तणावाचे वातावरण पसरले आहे. अशातच आता या प्रकरणात संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात एक याचिका दाखल केली होती. परंतु त्यांनी ती याचिका मागे घेतली आहे.
धनंजय देशमुख देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार :
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात दाखल केलेली याचिका मागे घेतली आहे. कारण या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल करा आणि त्याच्यावर मोक्का लावावा अशी मागणी धनंजय देशमुख यांनी याचिकेत केली होती.
याशिवाय धनंजय देशमुख यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी याचिकेत केली होती. मात्र आता त्यांनी ती याचिका मागे घेतली आहे. कारण संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सध्या सुरू असलेल्या तपासावर बऱ्यापैकी समाधानी असल्याचे मत धनंजय देशमुख यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळेच त्यांनी ही याचिका मागे घेतली आहे.
Santosh Deshmukh l धनंजय देशमुखांनी याचिका घेतली मागे :
दरम्यान, धनंजय देशमुख यांनी त्यांच्या वकिलामार्फत ही याचिका मागे घेतल्याची माहिती मिळाली आहे. मात्र आता या पार्श्वभूमीवर धनंजय देशमुख आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. तसेच भाजप आमदार सुरेश धस यांनी ही भेट घडवून आणल्याची माहिती समोर आली आहे.
मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीपूर्वी धनंजय देशमुख यांची उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घेतली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत धनंजय देशमुख यांची काय चर्चा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
News Title : Dhananjay Deshmukh withdraws petition
महत्वाच्या बातम्या –
‘या’ कारणास्तव आसाराम बापूला जामीन मंजूर!
मुंडे भाऊ-बहिणीविरोधात मराठा समाज आक्रमक, दोघांच्याही राजीनाम्याची केली मागणी
HMPV व्हायरसमुळे मृत्यू ओढावू शकतो का?; मोठी माहिती समोर
वाल्मिक कराडकडे कोट्यवधींची संपत्ती, आकडा पाहून अधिकारीही थक्क
पंकजा मुंडेंना कोणी पाडलं? सुरेश धस यांचा खळबळजनक गौप्यस्फोट