मुंबई | कोल्हापुर लोकसभेचे राष्ट्रवादीचे पराभूत उमेदवार धनंजय महाडिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असल्याची माहिती आहे. या भेटीने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.
धनंजय महाडिक भाजपच्या वाटेवर आहेत का? असा प्रश्नही राजकीय वर्तुळात रंगू लागला आहे. महाडिक यांनी जर भाजपात प्रवेश केला तर पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसेल.
भाजपला मिळालेल्या यशामुळे पराभूत उमेदवार भाजमध्ये जाण्याचा निर्णय घेऊ शकतात. यामध्ये कमी मताधिक्क्याने निवडून आलेले आमदार भाजपच्या जाळ्यात अडकतील, अशी शक्यता राष्ट्रवादीच्या नेत्याने वर्तवली आहे.
दरम्यान, भाजपने लोकसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीला खिंडार पाडून अनेक नेत्यांना पक्षात सामिल करून घेतलं होतं.
महत्वाच्या बातम्या
-‘या’ प्रकरणातून राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता
-खासदार धैर्यशील माने आशीर्वादासाठी पोहोचले थेट राजू शेट्टींच्या घरी
-“राममंदिराबाबत न्यायालयाने पुरावे चिवडीत बसू नये; जनादेश मानायला हवा”
-भाजपात जाण्याच्या चर्चांवर विश्वजीत कदम म्हणतात…
-लोकसभेचा निकाल म्हणजे जनतेने राम मंदिराच्या बाजूने दिलेला कौल- उद्धव ठाकरे
Comments are closed.