बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजप प्रवेशाच्या चर्चेवर धनंजय महाडिक म्हणतात…

कोल्हापूर | कोल्हापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार धनंजय महाडिक भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. मात्र महाडिक यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना भाजपप्रवेशाला नकार दिला आहे.

मी फक्त सहकारी कारखान्याच्या कामासाठी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, असं म्हणत धनंजय महाडिक यांनी या चर्चांणा पुर्णविराम दिला आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्याशी भेटीगाठी करून पक्षप्रवेश करत असल्याचं यापूर्वी पहायला मिळालं आहे. यामुळे महाडिक आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीने महाडिकांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली होती.

दरम्यान, कोल्हापूरमध्ये शिवसेनेच्या संजय मंडलिक यांनी महाडिकांचा 2 लाख 70 हजारांच्या मताधिक्याने पराभव केला आहे.

महत्वाच्या बातम्या

-विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट

-लोकसभेचे निकाल पाहून माझी अक्कल काम करत नाहीए- आझम खान

-मृत भाजप कार्यकर्त्यांच्या नातेवाईकांना मोदींच्या शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण

-साध्वी म्हणते…तरुणांना सैनिक बनण्याची प्रेरणा मिळावी म्हणून तलवार वाटप!

-“बरं झालं लग्न केलं नाही, नाहीतर मलाही पतीच्या चितेमध्ये उडी घ्यावी लागली असती”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More