रामदास कदम नव्हे हे तर ‘दाम’दास कदम- धनंजय मुंडे

रत्नागिरी |  गुहागरच्या सभेत बोलताना पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सडकून टीका केली आहे.

शिवसेना मंत्र्यांचे चिरंजीव निवडणुकीला उभे राहतायेत, ते कामाच्या जोरावर नाही तर ‘दामा’च्या जोरावर. तुम्ही त्यांना भलेही रामदास म्हणतं असाल पण आम्ही त्यांना ‘दाम’दास कदम म्हणतो, अशी घणाघाती टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.

ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेच्या निमित्ताने गुहागर येथे बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी भाजप शिवसेनेवर जोरदार हल्ल्बोल केला आहे.

दरम्यान, ज्या कोकणाने शिवसेनेला भरभरून दिले त्या कोकणी माणसाला शिवसेनेनं काय दिले? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-ऑस्ट्रेलियाचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय

-भाजप-शिवसेनेमध्ये युतीबाबत सकारात्मक चर्चा

-“राज्याला लुटणा-या युती सरकारला आगामी निवडणुकीत गाडून टाका”

-“शिवसेना आणि भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू”

-2019 ची लोकसभा निवडणूक म्हणजे पानिपतची लढाई- अमित शहा