बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ पदांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय; धनंजय मुंडेंनी दिली माहिती

मुंबई | समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षक आणि समकक्ष पदांवरील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठीचा प्रस्ताव सभागृहात मांडण्यात आला होता. या प्रस्तावाला आता मंत्रिमंडळाकडून मंजूरी मिळाली असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. त्यामुळे आता राज्यातील अकृषिक विद्यापीठांशी संलग्न असलेल्या समाजकार्य विद्यालयातील शिक्षकांना आणि समकक्ष पदावरील कर्मचाऱ्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अनुषंगाने सातवा वेतन आयोग लागू होणार आहे.

मंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर धनंजय मुंडेंनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना त्यांनी या निर्णयाची माहिती दिली. मंत्रिमंडळाच्या या निर्णयाचा 50 महाविद्यालयातील शिक्षक आणि समकक्ष पदावर असणाऱ्या तब्बल 562 कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. या 50 अनुदानित महाविद्यालयातील 562 कर्मचाऱ्यांमध्ये प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, ग्रंथपाल यांचा समावेश आहे.

या सर्व कर्मचाऱ्यांना वार्षिक 3% वेतनवाढ, सेवाशर्ती आणि रजा याबाबतची राज्य सरकारची नियमावली लागू राहणार आहे. तर 1 जानेवारी 2016 ते 31 जानेवारी 2019 पर्यंतची देयके अदा करण्यासाठी 52.74 कोटी खर्च अपेक्षित आहे. तर 1 एप्रिल 2019 पासूनच्या पुढच्या वार्षिक देयकांसाठी जवळपास 80.64 कोटी रूपयांची मान्यता देण्यात आली असल्याची माहिती धनंजय मुंडेंनी दिली.

महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार धनंजय मुंडेंनी सामाजिक न्याय विभागामार्फत पाठपुरावा केला. अखेर या अनुदानित महाविद्यालयातील शिक्षक आणि समकक्ष पदांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा एकमुखाने निर्णय झाला.

 

थोडक्यात बातम्या-

जि.प आणि पंचायत समिती निवडणुक निकालावर अजित पवारांनी व्यक्त केल्या भावना, म्हणाले…

दिलासादायक! कोरोना लसीनंतर आता येणार ‘या’ साथीच्या रोगाची लस

आर्यन खान घरी जाणार की रवानगी पुन्हा कोठडीत होणार? आज होणार निर्णय

महिला ओरडत असतानासुद्धा चालत्या गाडीला रोखून केला अश्लील स्पर्श, निर्लज्ज गुंडांचा व्हिडीओ व्हायरल

देशातील कोरोना रूग्णसंख्या वाढली; पण सक्रिय बाधितांची संख्या मात्र नियंत्रणात?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More