मुंबई | राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे गंभीर आरोप झाले आहेत. त्यानंतर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्षाने केली होती. मात्र तरूणीवर दोन नेत्यांनी केलेल्या ब्लॅकमेलच्या आरोपाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी तूर्तास राजीनामा घेण्यास नकार दिला. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली आहे.
वंचितच्या प्रवक्त्या दिशा शेख यांनी मुंडे प्रकरणात मांडलेली भूमिका कायम आहे. त्यामुळे आंदोलन कुणासाठी करायचे? शेतकरी आंदोलकांसारखे आम्हाला तिष्ठत ठेवतील. धनंजय मुंडे यांचा जीव शरद पवार नावाच्या पोपटात अडकला असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
संबंधित महिलेच्या चारित्र्यावर शंका घेतली जात आहे. याप्रकारची शंका घेणारे वैदिक विचारांचे असतात आणि त्यांच्या बाजूने वंचित कधीच नसल्याचं आंबेडकर म्हणाले.
दरम्यान, धनंजय मुंडेंचा राजीनामा देण्याची हमी शरद पवार देत असतील तरच आंदोलन करण्यात अर्थ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी आंदोलकांना वेठीस धरलं तसं पवार आम्हाला वेठीस धरतील तर मग पवार आणि मोदी यांच्यात फरक काय राहिला?, असंही आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
“कुठल्या तरी कंपनीत ड्रायव्हर म्हणून जायचं, हे चुकून इकडं आलेत”
“जनतेला ठाकरे सरकारचा कंटाळा आला आहे”
श्रीपाद नाईक यांचा रुग्णालयातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल!
पिंजऱ्याच्या बाहेर आल्यावर लोक मुख्यमंत्री कसा आहे हे तरी किमान पाहतील- नारायण राणे
“राज्यात लसीकरण मोहिमेचा फज्जा उडाल्याबद्दल आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा”