धनंजय मुंडेंनी ऐनवेळी निर्णय बदलला, तटकरे तोंडावर पडले

Dhananjay Munde

Dhananjay Munde | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिर्डी येथे आजपासून (18 जानेवारी) सुरू होणारे अधिवेशन राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. अधिवेशनाआधीच ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीवरून तर्क-वितर्क सुरू होते. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि छगन भुजबळ हे अधिवेशनासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती दिली होती. मात्र ऐनवेळी धनंजय मुंडे यांनी आपला निर्णय बदलला आहे.

धनंजय मुंडे यांची ऐनवेळी दांडी

धनंजय मुंडे यांच्या कार्यालयातून प्रकृती अस्वस्थ असल्याचे कारण देत त्यांची अधिवेशनाला अनुपस्थिती स्पष्ट करण्यात आली आहे. ते परळीमध्येच मुक्काम करणार असल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे, गेल्या दोन दिवसांपासून धनंजय मुंडे परळीमध्ये सक्रिय होते आणि त्यांनी जनता दरबारही घेतला होता. त्यामुळे त्यांची अचानक गैरहजेरी आश्चर्याचा विषय ठरत आहे.

छगन भुजबळांची अनुपस्थिती

छगन भुजबळ अधिवेशनासाठी येणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती, मात्र ते अनुपस्थित राहिले. त्यांच्या गैरहजेरीमुळे चर्चेला उधाण आले असले, तरी त्यांच्या पुत्र पंकज भुजबळ अधिवेशनाला हजर असल्याचे दिसून आले.

तटकरेंचा शरद पवार गटाला टोला

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शरद पवार गटावर टीका करत, सत्ता वाटाघाटीतील अजित पवार यांची भूमिका योग्य असल्याचे प्रतिपादन केले. “सत्ता हवी असल्यास बहुजन हित साधता येते,” असे त्यांनी नमूद केले. (Dhananjay Munde)

Title : Dhananjay Munde absent in Shirdi NCP convention

महत्वाच्या बातम्या- 

‘त्या रात्री त्याने…’; करीना कपूरच्या जबाबातून धक्कादायक खुलासा समोर

‘सैफ अरे तू इतका करोडपती आहेस, मग…’; राखीचा सैफ अली खानला सल्ला

शुद्धीवर आल्यावर सैफने सर्वात पहिले डॉक्टरांना विचारला ‘हा’ प्रश्न

फलटण हादरलं! उसाच्या शेतात सापडला अर्धवट अवस्थेतील मृतदेह

थरकाप उडवणारी घटना! मित्राचा चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं, धक्कादायक कारण समोर

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .