बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“धनंजय मुंडे यांचाही आमच्या पक्षाला पाठिंबा”, करूणा मुंडेंचा दावा

अहमदनगर | सामाजिक न्यायविकास मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि सामाजिक कार्यकर्त्या करूणा मुंडे (Karuna Sharma) यांच्यातील वाद संपूर्ण महाराष्ट्राला परिचीत आहे. काही दिवसांपूर्वी करूणा मुंडे यांनी अहमदनगर येथे नवीन पक्षाची घोषणा केली होती. त्यानंतर खळबळ माजली होती. आता पुन्हा त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे खळबळ माजली आहे.

करूणा मुंडे यांनी पक्षाच्या प्रसारासाठी दौऱ्याला सुरुवात केली आहे. अहमदनगरमधील संगमनेर येथून त्यांनी दौऱ्याला सुरुवात केली आहे. यावेळी त्यांनी संगमनेर येथे पत्रकार परिषद घेतली आहे. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी धनजंय मुंडे यांचाही माझ्या पक्षाला पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्याने खळबळ माजली आहे.

‘मी काहीच करू शकणार नाही असे वाटणाऱ्या पती धनंजय मुंडे यांचाही आमच्या नव्या पक्षाला पाठिंबा आहे’, असं वक्तव्य करूणा मुंडे यांनी केलं आहे. याशिवाय एक अदृष्य शक्ती आपल्याकडून हे कार्य करवून घेत असून, महिला व सामाजिक भान असलेल्या कार्यकर्त्यांनी संपर्क करावा, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

दरम्यान, करूणा मुंडे यांनी मागील महिन्यात अहमदनगर येथे शिवशक्ती सेना या पक्षाची घोषणा केली होती. मागील काही दिवसांत आपल्यावर प्रचंड अन्याय झाल्याच्या भावनेतून, संघर्षासाठी नवीन पक्षाची स्थापना केली आहे, असं करूणा मुंडे यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

प्रतिक्षा संपली! सुपरडुपर हिट पुष्पा सिनेमा आजपासून टीव्हीवर पाहता येणार!

मोठी बातमी! ओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने दिला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

महिलेच्या केसात थुंकल्याच्या प्रकरणावरून जावेद हबीब यांनी मागितली माफी, म्हणाले…

‘या’ तारखेपासून राज्यात मुसळधार पावसाचा तडाखा, हवामान विभागाचा इशारा

‘या’ तारखेपासून मिळणार बूस्टर डोस, नवी नियमावली जाहीर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More