Top News बीड महाराष्ट्र मुंबई

रेणू शर्मा यांच्यानंतर आता धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्यातील वादही मिटणार!

Photo Credit- Dhananjay Munde Facebook Page

मुंबई | रेणू शर्मा यांनी बलात्काराची तक्रार मागे घेतल्यानंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता धनंजय मुंडे यांची लिव्ह इन पार्टनर करुणा शर्मा यांच्यासोबत असलेला वादही मिटण्याच्या मार्गावर आहे.

वाद सोडवण्यासाठी मध्यस्थाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. न्यायालयात यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलेले असून आता हे प्रकरण मध्यस्थांसमोर जाणार आहे. मध्यस्थीचा खर्च धनंजय मुंडे करणार आहेत.

रेणू शर्मांनी बलात्काराचे आरोप करण्यापूर्वी धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी ४ डिसेंबर २०२० रोजी करुणा शर्मा यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा व भरपाईचा गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान, मुंडे यांनी आपल्यासोबतचे खासगी फोटो, व्हिडीओ तसेच ऑडिओ रेकॉर्डिंग हे फेसबुक, व्हॉट्सअप, इन्स्टाग्राम किंवा ट्विटरवर तसेच इलेक्ट्रॉनिक किंवा प्रिंट मीडियामध्ये प्रसिद्ध करण्यास मनाई करावी, अशी विनंती न्यायालयाला केली होती. त्याप्रमाणे न्यायालयाने १६ डिसेंबर रोजी यासंदर्भात सशर्त मनाई आदेश काढला होता.

थोडक्यात बातम्या-

…शेवटी लेकाने पालिका मुख्यालायत आणलं; अजित पवारांकडून आदित्य ठाकरेंचं कौतुक

‘हा’ राजकीय आणि सांस्कृतिक दहशतवाद, तो संपवावाच लागेल- संजय राऊत

“कृषी कायदे परत घेतले नाही, तर मी आत्महत्या करेन”

आता फारकाळ विरोधी पक्षात राहायचं नाही- देवेंद्र फडणवीस

भाजप नेत्याचा महिलेसोबतचा अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या