अरे लाज नाही वाटतं का? फोटो काय काढता? धनंजय मुंडेंनी तरूणांना झापलं!

बीड | बीड-परळी रस्त्यावर काल अपघात झाला होता. त्या अपघातात दोन तरुण रस्त्यावर जखमी अवस्थेत पडले होते. याचवेळी मुंडे यांचा ताफा त्याठिकाणाहून जात होता. त्यावेळी  मुंडेंनी तात्काळ गाडी थांबवून या जखमींना रूग्णालयात दाखल केले. दरम्यान या वेळी काही तरूण त्या घटनेचा फोटो आणि व्हिडिओ काढत होते. त्यांना मुंडेंनी चांगलंच झापलं.

 अरे लाज वाटत नाही का ? फोटो काय काढता ? जखमीना उचलू लागा, ती अपघातग्रस्त गाडी आधी रस्त्यातून बाहेर काढा असं सुनावलं.

दरम्यान, मुंडेंनी वेळेवर या जखमींना रूग्णालयात दाखल केल्यामुळे ते धोक्याच्या बाहेर असल्याचे डॉ थोरात यांनी सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-#MeToo | मोदी साहेब उद्या तुमच्यावरही आरोप होतील- शक्ती कपूर

-महिलांचा अवमान करणाऱ्या सरकारला शिवाजी महाराजांचे आशीर्वाद मिळणार तरी कसे?

-महिलेकडून शरीरसुखाची मागणी; त्रासाला कंटाळून तरूणाची अात्महत्या

-70 टक्के पेक्षा जास्त मुली ब्लॅकमेल करत आहेत; शक्ती कपूर यांचं मोदींना मध्यस्तीचं आवाहन

-धक्कादायक!!! व्हॉट्सअॅपवरील चॅटिंगमुळे एकाची निर्घृण हत्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या