Dhananjay Munde | महायुती सरकारचं खातेवाटप अखेर शनिवारी जाहीर झालं. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर, महिन्याभरानंतर, खातेवाटप करण्यात आलं. यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तीन आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दोन खाती मिळाली आहे.
खातेवाटप होत नाही तोच, धनंजय मुंडे यांचं मंत्रीपद अडचणीत आलं आहे. एवढंच नाही तर, संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांना अटक व्हावी आणि त्यांची हकालपटी करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
अजित दादांनी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी दिली आहे. आता बारामतीमध्ये याच गोष्टीवरुन हलचाली निर्माण होत आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांचं मंत्रीपद जाणार की काय? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांना गुन्हेगारांचा नेता म्हणून तात्काळ हकालपट्टी करून त्यांना अटक करावी, अशी मागणी मराठा बांधवांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
धनंजय मुंडे गुन्हेगारांचा नेता-
तर हे प्रकरण एवढ्यावरंच थांबलं नाही तर, याबाबत त्यांनी एक निवेदन समाजाच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलं आहे. संतोष देशमुख हे मराठा समाजाचे आहेत आणि त्यांचा सर्वात मोठा अडसर मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना होता. त्यामुळेच परळीत त्यांची आपल्या मंत्रिमंडळातील नेत्याने वाल्मीक कराड यांच्यामार्फत देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे.
आपल्या मंत्रिमंडळातील धनंजय मुंडे हे गुन्हेगारांचे नेते आहेत म्हणून त्यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी आणि त्यांना तातडीने अटक करावी अशी मागणी केली आहे.
बारामतीमध्ये मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे एक पत्र सादर करून मुंडे यांच्या अटकेची मागणी केली आहे. या पत्रात त्यांनी संतोष देशमुख यांच्या हत्याकांडात मुंडे यांचा संभाव्य संबंध असल्याचा दावा केला आहे व त्यांच्याविरुद्ध त्वरित कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.
News Title : Dhananjay Munde arrest demand in baramati
महत्त्वाच्या बातम्या-
‘मी मंत्री आहे तर पालकमंत्री पण मीच…’; महायुतीत पालकमंत्रीपदावरून वाद
संतोष देशमुख प्रकरणी नवी अपडेट, मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ निर्णयानंतर कारवाईला वेग
मोठी बातमी! राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र, पाहा फोटो
ऐन थंडीत महाराष्ट्रात पावसाचं सावट, यलो अलर्ट जारी
‘या’ प्रसिद्ध आर्ट डायरेक्टरनं उचललं टोकाचं पाऊल?, सिनेसृष्टित एकच खळबळ!