Dhananjay Munde | राज्याच्या इतर लोकसभा मतदारसंघांपैकी बीड मतदारसंघ हा महत्त्वाचा मतदारसंघ आहे. बीड लोकसभा मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये बीड लोकसभा मतदारसंघातून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना लोकसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यांच्याविरोधात शरद पवार गटाचे नेते बजरंग सोनावणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे बीड लोकसभा मतदारसंघाकडे अनेकांचं लक्ष लागलं. पंकजा मुंडे यांच्या प्रचारसभेला धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी पंकजा मुंडे यांच्याबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलंय. पंकजा मुंडे बीडमध्ये येताना केंद्रीय मंत्री म्हणून येतील असं धनंजय मुंडे (Dhananjay Munde) म्हणाले.
“बजरंग सोनावणे यांच्यावर हल्लाबोल”
यावेळी बोलत असताना त्यांनी पंकजा मुंडे यांचे विरोधक आणि शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनावणे यांच्यावर टीका केली आहे. समोरील विरोधक उमेदवार जातीपातीचे राजकारण करत आहे. त्यांनी आधीच कुणबी प्रमाणपत्र काढून घेतलं आहे. त्यावर कोणाचाही आक्षेप नाही. मात्र स्वत:चं कुणबी प्रमाणपत्र त्याचा राजकीय लाभ एका निवडणुकीमध्ये घेतला. त्यापेक्षा वीस-पंचवीस हजार गोरगरीब आणि सामान्य लोकांना कुणबी प्रमाणपत्राचा लाभ मिळवून दिला असता तर मी त्यांच्या मानाचा मोठेपणा पाहिला असता, असा टोला धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी लगावला आहे.
कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी विरूद्ध मराठा लढत नसून ओबीसी विरूद्ध ओबीसी अशी लढत आहे, अशा शब्दांत धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी विरोधकांवर निशाणा साधला. यावेळी बोलत असताना त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाचं कोतुक केलं आहे.
“मोदींच्या नेतृत्वामध्ये देश प्रगती करत आहे”
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात कोरोना महामारीच्या काळात देशाने अनेक परदेशातील देशांना मदत केलीये. आज कोट्यवधी लोकांना मोफत राशन मिळत आहे. कोणाची जात धर्म न पाहता राशन दिलं जात आहे. यापलिकडे जाऊन नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये देश प्रगती करत आहे, असं धनंजय मुंडे बोलत असताना त्यांनी नरेंद्र मोदी यांचा उदोउदो केला.
मराठवाड्याचं 165 टीएमसी पाण्याचे तुटीचे खोरे भरून काढण्याचा प्रकल्पाचा प्रस्ताव शासनाकडे आहे. यासाठी सुमारे 17 हजार कोटी सुमारे खर्च येणार आहे. राज्यशासन आणि केंद्र शासनाकडून निधी खेचून आणावा लागेल. यासाठी केंद्रात वजन असणारा खासदार आपल्याला निवडून आणावा लागणार आहे. यातून 42 टीएमसी पाणी हे बीड जिल्ह्याला मिळणार आहे. बीड जिल्ह्यात जलक्रांती होणार असल्याचं धनंजय मुंडे म्हणालेत.
दरम्यान, बीड लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे या लोकसभेसाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर त्यांच्यासोबत धनंजय मुंडे यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे. तर त्यांच्याविरोधात शरद पवार गटातून बजरंग सोनावणे यांना उमेदवारी देण्यात आलीये. कोणाचं पारडं मतांनी जड राहणार ही येणारी वेळ सांगेल.
News Title – Dhananjay Munde Big Statement On Pankaja Munde Loksabha Election 2024
महत्त्वाच्या बातम्या
‘त्या नेत्याने 45 वर्षांपूर्वी हा खेळ…’; मोदींची शरद पवारांवर घणाघाती टीका
रोहित पवारांचा अत्यंत धक्कादायक दावा, फडणवीसांवर केला गंभीर आरोप
“30 वर्षात एखाद्या गावात साधा रस्ताही गीतेंनी केला नाही”, तटकरेंचं गीतेंना प्रत्युत्तर
UGC NET परीक्षेची तारीख बदलली; आता परीक्षा ‘या’ दिवशी होणार
भाजपच्या पदाधिकाऱ्याचा बँक घोटाळा कसा झाला उघड?, मोठी माहिती हाती