Top News

“कोरोनातून महाराष्ट्र मुक्त व्हावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, याच माझ्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा”

मुंबई | राज्यातील सध्या कोरोनाची परिस्थिती लक्षात घेतला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी यंदा वाढदिवस साजरा न करण्यास कार्यकर्त्यांना सांगितलं आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माझा वाढदिवस साजरा करू नका ही आपणा सर्वांना विनंती आहे. बीड जिल्ह्यासह संबंध महाराष्ट्रावर कोरोनाच्या संकटाचे सावट आहे, यातून मुक्त होण्यासाठी सर्वांनी आहेत तिथेच राहून प्रयत्न करावेत, याच माझ्यासाठी या वर्षीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत, असं धनंजय मुंडे म्हणालेत. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलंय.

तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा – आशीर्वाद मला लढण्याचे बळ देतात, परंतु यावर्षी कोरोनाशी लढण्याचे मोठे आव्हान आपल्या समोर असून, त्यासाठी आपण सर्वांनी सुरक्षित राहणे गरजेचे आहे. सर्वांच्या शुभेच्छा आशीर्वाद माझ्या सोबत आहेतच, कोणीही शुभेच्छा देण्यासाठी येण्याचा प्रयत्न करू नये. कुटुंबाची आणि स्वतःची काळजी घ्यावी, असंही धनंजय मुंडे म्हणाले.

नुकतंच धनंजय मुंडे कोरोनावर मात करत घरी परतले आहे. यापूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला होता.

महत्वाच्या बातम्या-

राज्यात आज 6741 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद, पाहा तुमच्या भागात किती?

‘हे’ कारण देत कोरोना टेस्ट करण्यास रेखाने दिला नकार!

‘नागपुरातील हनीट्रॅप प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर चौकशी करा’; देवेंद्र फडणवीसांचं अनिल देशमुखांना पत्र

आता महाराष्ट्रातील ‘या’ शहरातही १६ जुलैपासून लॉकडाऊन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या