Top News

मला जो त्रास झाला तो तुझ्या वाट्याला येऊ नये, पंकजाताई काळजी घे- धनंजय मुंडे

मुंबई | सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या भगिनी आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे.

या आजारात होणारा त्रास मी अनुभवला असून त्यादृष्टीने काळजी घेण्याचा सल्लाही धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना दिला आहे. स्वतःची व कुटुंबीयांची काळजी घ्या व लवकर बऱ्या व्हा असा सल्ला धनंजय मुंडे यांनी फोनवरून दिला आहे.

पंकजाताई मी स्वतः कोरोना विषाणूचा त्रास सहन केला आहे, तो त्रास तुझ्या वाट्याला येऊ नये. कोरोनाविषयक सर्व चाचण्या करून घे. स्वतःची व घरच्यांची काळजी घे. तुला काहीही होणार नाही, लवकर बरी हो. मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहे, असं ट्विट धनंजय मुंडे यांनी केलं आहे.

दरम्यान, पंकजा मुंडे यांची प्रकृती अचानक बिघडल्याची माहिती आज सकाळीच समोर आली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी आयसोलेट होण्याचा निर्णय घेतला होता. पंकजा मुंडे यांनी ट्विट करुन कार्यकर्त्यांना याबद्दल माहिती दिली होती.

 

महत्वाच्या बातम्या-

“आठ महिने मंत्रालयात पाऊल न टाकणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राने इतिहासात पाहिला नाही”

मंदिरातील पुजारी अर्धनग्न, मग भक्तांच्या कपड्यांबाबत निर्बंध का?- तृप्ती देसाई

ईडीने नारायण राणे यांच्या संपत्तीची चौकशी करावी; शिवसेना खासदाराची मागणी

अभिजीत बिचुकले यांनी मतदार यादीत नाव नोंदणी केली नाही; जिल्हाधिकाऱ्यांचा खुलासा

“मुख्यमंत्री असताना आरक्षण देता आलं असतं, पण शरद पवारांनी दुर्लक्ष केलं”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या