पुणे महाराष्ट्र

पुढे चौकीदार आणि मागे चोर असा मोदींचा कारभार आहे – धनंजय मुंडे

जामखेड | पुढे चौकीदार आणि मागे चोर असा मोदींचा कारभार आहे, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. ते जामखेडमध्ये प्रचार सभेत बोलत होते.

गेल्या पाच वर्षात भाजप सरकारमध्ये कोणी भ्रष्टाचार केला नसल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अकलूजच्या सभेत बोलताना केला होता. पण स्टेजच्या मागे बसलेले सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी 550 कोटींचा तूर घोटाळा केला असल्याचा आरोप धनंजय मुंडेंनी केला आहे.

ऊसतोड मजूरांचे महामंडळ मोडून काढण्याचा निर्णय घेऊन ऊसतोड मजूरांसह स्व. गोपीनाथ मुंडेंचा देखील अपमान करण्यात आला आहे, असं धनंजय मुंडेंनी म्हटलं आहे.

आपण कुठला वारसा चालवत आहोत हे एका महिला मंत्र्यांनी दाखवून दिलं आहे, अशी बोचरी टीका धनंजय मुंडेंनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंवर केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

‘या’ काँग्रेसच्या उमेदवारासाठी मुकेश अंबानी निवडणुकीच्या प्रचारात!

-राज ठाकरेंनी कट-पेस्टचं राजकारण करणं सोडून द्यावं- विनोद तावडे

नरेंद्र मोदींच्या हेलिकाॅप्टरची झडती घेणे पडले महागात; अधिकाऱ्याचे निलंबन

-मला चौकीदार नको देश सांभाळणारा मालक हवाय- शरद पवार

“चौकीदार साहेबांच्या दररोज 20 तास काम करण्याने देश उद्ध्वस्त होतोय”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या