बीड | छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मभूमीतील माती कपाळाला लावून या दळभद्री सरकारला याच मातीत गाडण्याची शपथ घेतलीये, असं धनंजय मुंडे म्हणाले. राष्ट्रवादीच्या ‘शिवस्वराज्य’ यात्रेच्या सभेत ते बोलत होते.
राष्ट्रवादीने शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आज परळी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता. या मोर्चाला धनंजय मुंडे उपस्थित होते. यावर आज माझ्या मातीसाठी परळीत धावून आलो. ही माती समृद्ध व्हावी, माझा शेतकरी बांधव मोठा व्हावा हेच माझे स्वप्न आहे, असं त्यांनी म्हटलं.
शेतकऱ्यांना पिकविमा मिळाल्याशिवाय, उसाला एफआरपी प्रमाणे पैसे मिळाल्याशिवाय, दुबार पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार मिळाल्याशिवाय आम्ही येथून हलणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीने दिला आहे.
दरम्यान, भाजप शिवसेना सरकारची जुलमी राजवट उलथवून टाकल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असंही मुंडे म्हणाले.
कालच @NCPspeaks पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेस छत्रपति शिवाजी महाराज यांच्या जन्मभूमितील माती कपाळाला लावून या दळभद्री सरकारला याच मातीत गाढण्याची शपथ घेतली. आणि आज माझ्या मातीसाठी परळीत धावून आलो. ही माती समृद्ध व्हावी, माझा शेतकरी बांधव मोठा व्हावा हेच माझे स्वप्न आहे. pic.twitter.com/IUinfTaC1B
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) August 7, 2019
जनसामान्यांच्या न्याय-हक्कासाठी परळी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर @NCPspeaks तर्फे धडक मोर्चा काढला. शेतकऱ्यांना पिकविमा मिळाल्याशिवाय, उसाला एफआरपी प्रमाणे पैसे मिळाल्याशिवाय, दुबार पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार मिळाल्याशिवाय आम्ही येथून हालणार नाही असा इशारा दिला. pic.twitter.com/99jL0TJGtR
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) August 7, 2019
महत्वाच्या बातम्या-
-सुषमा स्वराज यांचं पार्थिव पाहताच ‘MDH’च्या मालकाला अश्रू अनावर
-अजित पवारांवर टीका करणारा ‘तो’ बॅनर राष्ट्रवादीने जाळला!
-‘मुतऱ्या तोंडाचा अजित…’; गिरीश महाजन-अजित पवार यांच्यात जुंपली!
-…अन् छत्रपती संभाजीराजे निघाले पूरग्रस्तांना मदतीला!
-“महाजन पळवा-पळवी करतील की राज्यातील पूरस्थितीची पाहणी”
Comments are closed.