आमच्या बहिणीने तर लहान मुलांच्या चिक्कीचे पैसे खाल्लेत- धनंजय मुंडे

पालघर | आमच्या बहिणीने तर लहान मुलांच्या चिक्कीचे पैसे खाल्लेत, असं म्हणत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

राष्ट्रवादी परिवर्तन यात्रा आज पालघरमधील विक्रमगड येथे पोहोचली यावेळी त्यांनी आपल्या आक्रमक शैलीत भाजप आणि पंकजा मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

फडणवीस सरकारमधील 16 मंत्र्यांनी 90 हजार कोटी लुटून नेले. फडणवीस यांनी राज्याला ‘भ्रष्टाचारयुक्त’ केले, असंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मोदींचं भाषण ऐकूण मला ‘गजनी’तला आमिर खान आठवतो, असं म्हणत त्यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-मुंबईतल्या उद्धव ठाकरेंच्या ‘घणाघाती भाषणातील’ प्रमुख मुद्दे एकाच ठिकाणी

-शिवसेनेला पटकणारा पैदा झाला नाही आणि पैदा होणारही नाही- उद्धव ठाकरे

-विष्णुचा अवतार राम मंदिर बांधू शकत नाही- उद्धव ठाकरे

-लाट कसली लाट, लाटेची लावू वाट; उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात

-डाॅ. डी वाय पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशावर शरद पवार म्हणतात…!

 

Google+ Linkedin