Top News

“माढ्यातील काही मुलं गद्दार निघाली, घरातल्या माणसाला सोडून दुसऱ्यांचा हात धरला”

सोलापुर |  माढा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार संजय मामा शिंदे यांच्या प्रचारार्थ आज राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी कुर्डुवाडी येथे सभा घेतली. यावेळी त्यांनी मोहिते पिता पुत्रांचं नाव न घेता त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

माढ्यातले काही मुलं तर खुपच गद्दार निघाली, घरातल्या माणसाला सोडून दुसऱ्यांचा हात धरला. काय कमी केलं होतं पवार साहेबांनी यांच्यासाठी?, असा सवाल त्यांनी मोहिते पिता पुत्रांना विचारला.

इथली जनता राष्ट्रवादीवर, शरद पवार साहेबांवर प्रचंड प्रेम करणारी आहे. येत्या २३ मे रोजी माढ्यातली जनता सर्व हिशोब करणार, असंही धनंजय मुंडे म्हणाले.

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपने डाव टाकला आहे. मात्र हा डाव उलथून टाकण्याची धमक संजय शिंदेंमध्ये आहे. तुमच्या सर्वांच्या साथीने संजय मामांचं यश निश्चित आहे, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

महत्त्वाच्या बातम्या

-मोदी साहेब… महाराष्ट्र तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही- धनंजय मुंडे

-राहुल गांधी पंतप्रधान झाले तर…- आदित्य ठाकरे

तुमच्या वयाहून दांडगा पवार साहेबांचा अनुभव- सुप्रिया सुळे

-पक्षविरोधी भूमिका घेतल्याने काँग्रेसने केली ‘या’ नेत्याची पक्षातून हकालपट्टी

-हार्दिक पांड्या म्हणतो, माझ्या ‘हेलिकाँप्टर शाॅट’वर धोनीपण फिदा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या