“राज्याच्या मंत्रीमंडळात एक तरी शेतकऱ्याचं पोरगं दिसतंय का”??

मुंबई | राज्यातील मंत्र्यांना कोणत्याही ब्रँडचा चश्मा घालून बघा, एक तरी शेतकऱ्याचं पोरगं दिसतंय का? अशी बोचरी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

शेतकऱ्यांचं नेतृत्वच या सरकारमध्ये नाही आणि म्हणूनच आज आपल्या शेतकरी बांधवाची ही अवस्था आहे, असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

पंधरा वर्ष सतत केलेल्या नवसाने भाजपाकडे सत्ता आली. पण यांची परिस्थिती नवसानं पोर जन्मलं आणि मुक्यानं गेलं अशीच होणार आहे, असाही बोचरा वार त्यांनी यावेळी बोलताना केला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसची परिवर्तन यात्रा आज मुरबाडमध्ये येऊन पोहचली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“बच्चू भाऊ, या सरकारमध्ये दम नाही, दम आहे तो फक्त तुमच्यात”

-भ्रष्टाचाराचा मुद्दा काढला की मोदी घरात बसणं पसंत करतात- राहुल गांधी

-“बीडचा खासदार निवडून द्या, RSS वाल्यांना कायमचं जेलमध्ये टाकतो”

-गरीब सवर्णांना 10 टक्के आरक्षण देणारे गुजरात ठरले पहिले राज्य

-अंबाती रायडूच्या बॉलिंग अ‌ॅ‌‌‌‌‌‌‌‌‌‌क्शनवर पंचांनी उपस्थित केले प्रश्न ‌