Loading...

अधिवेशनाआधी धनंजय मुंडे आक्रमक; सरकारला कोंडीत पकडायचा ‘मास्टरप्लॅन’

मुंबई |  ‘भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र आणि विकासाचा आभास’ राज्य सरकारने उभा केला होता मात्र त्यांच्या निराशजनक कामगिरीवर येत्या पावसाळी अधिवेशनात त्यांना सळो की पळो करून सोडू, असं परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

धनंजय मुंडे यांनी अधिवेशनाआधी पत्रकार परिषद घेतली. आणि राज्य सरकारच्या कामावर आणि आज झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर सडकून टीका केली.

Loading...

खरं तर मेहतांचा राजीनामा 3 वर्ष अगोदरच घ्यायला पाहिजे होता. आणि मुख्यमंत्र्यांनी फक्त 6 मंत्र्यांना नारळ न देता सगळ्या भ्रष्ट मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवायला पाहिजे होता, असं धनंजय मुंडे म्हणाले.

आभासी विकासाचा उत्तम नमुना म्हणजे देशात आणि रोजगाराची वाढलेली टक्केवारी, असं म्हणत त्यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला.

Loading...

महत्वाच्या बातम्या

-प्रकाश मेहतांना भ्रष्टाचाराचं प्रकरण भोवलं; अखेर मुख्यमंत्र्यांनी त्यांना घरी बसवलं

-मोदींमध्ये हिम्मत; आम्ही सर्व मिळून राम मंदिर बांधू- उद्धव ठाकरे

-“विरोधात असताना मलाही ऑफर आल्या पण सत्तेसाठी कधी पक्ष बदलला नाही”

Loading...

-गेल्या महिन्यात राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी ; या महिन्यात लागली मंत्रिपदाची लॉटरी

-आज मंत्रिमंडळ विस्तार अन् आजच्याच दिवशी खडसेंनी व्यक्त केली खदखद

Loading...