“मी सादर केलेले पुरावे खोटे निघाले तर जाहीर फाशी घेईल”

परभणी | भाजप सरकारमधील 22 मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे मी विधान परिषदेत दिले आहेत. पण दुर्देव असं आहे की त्यातील एका मंत्र्यावर देखील कारवाई झालेली नाही. माझे पुरावे खोटे निघाले तर मी जाहीर फाशी घेईल, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते मेळावा गुरूवारी परभणीत आयोजित करण्यात आला आहे. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना धनंजय मुंडेंनी भाजप सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं.

भाजप फोडाफोडीचं राजकारण करत आहे. पण जो पर्यंत पक्षातील तरूण सक्षमपणे पक्षाच्या पाठीमागे उभा आहे तोपर्यंत पक्ष संपणार नाही, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

ज्या नेत्यांना शरद पवारांनी मोठं करून पदं दिली त्यांनी आज साथ सोडली. पण आता त्यांनी देवाची काठी जशी पडते तशी पवारांची काठी पडणार आहे. पण तिचा आवाज कुठे येणार नाही, असा इशारा पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना दिला आहे.

दरम्यान, नागव्याचे नवग्रह बलवान असतात, त्यामुळे ईडीची भीती आम्हाला दाखवू नका, अशा शब्दांत धनंजय मुंडेंनी भाजपच्या मंडळींवर टीका करत हा पक्ष मातीत गाडल्याशिवाय आपण गप्प बसणार नसल्याचा इशारा दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-