महाराष्ट्र मुंबई

मोदी साहेब… महाराष्ट्र तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही- धनंजय मुंडे

मुंबई |  आमच्या महाराष्ट्राच्या मातीतील जवानांचा अपमान करणं ही तुमची संस्कृती असेल तर मोदी साहेब… महाराष्ट्र तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

मुंबई हल्ल्यातील शहीद पोलिस अधिकारी हेमंत करकरे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांना उमेदवारी देण्याच्या निर्णयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी समर्थन केले आहे. त्यावरच धनंजय मुंडेंनी तोफ डागली आहेे.

भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणू काठी… अशी शिकवण आम्हाला संतश्रेष्ठ तुकोबारायांनी दिली आहे. या निवडणुकीत महाराष्ट्र तुम्हाला नक्की धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असं मुंडेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, भाजपने मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंग हिला भोपाळमधून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

-‘आर्ची’ला जायचंय ‘या’ बाॅलिवूड अभिनेत्यासोबत डेटवर!

-राहुल गांधी पंतप्रधान झाले तर…- आदित्य ठाकरे

तुमच्या वयाहून दांडगा पवार साहेबांचा अनुभव- सुप्रिया सुळे

-पक्षविरोधी भूमिका घेतल्याने काँग्रेसने केली ‘या’ नेत्याची पक्षातून हकालपट्टी

-हार्दिक पांड्या म्हणतो, माझ्या ‘हेलिकाँप्टर शाॅट’वर धोनीपण फिदा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या