जालना | केंद्रिय मंत्री रावसाहेब दानवे यांचं होम ग्राऊंड असलेल्या जालना जिल्ह्यातील भोकरदन या ठिकाणी राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा पोहचली. या यात्रेदरम्यान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी रावसाहेब दानवेंवर टीका करताना चक्क त्यांचं नाव खाऊसाहेब दानवे ठेवलं.
जालना जिल्ह्याने रावसाहेब दानवेंना अनेक वेळा लोकसभेवर जाण्याची संधी दिली. पण खाऊसाहेब दानवेंनी प्रत्येक वेळी बदल्यात चकवाच दिला, असा टोला त्यांनी लगावला.
मुख्यमंत्र्यांसारखेच दबावतंत्र दानवे वापरत आहे. आपल्या कार्यकर्त्यांवर खटले दाखल केले जात आहेत. येत्या निवडणुकीत यांना निवडून न देता चकवा देऊयात, असं ते भाषणात म्हणाले.
महाराष्ट्र काँग्रेस-राष्ट्रवादी मुक्त करण्याची भाषा करणारे भाजप स्वतःच राष्ट्रवादी‘युक्त’ होऊन बसले आहे, असंही ते म्हणाले.
इथले खासदार @raosahebdanve यांना जनतेने अनेकवेळा संधी दिली. त्यांच्या मुलाला आमदारकी दिली पण ‘खाऊ’साहेब दानवेंनी नेहमी ‘चकवाच’ दिला. मुख्यमंत्र्यांसारखेच दबावतंत्र दानवे वापरत आहे. आपल्या कार्यकर्त्यांवर खटले दाखल केले जात आहेत. येत्या निवडणुकीत यांना निवडून न देता चकवा देऊयात. pic.twitter.com/j0e39ieCIV
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) August 19, 2019
महत्वाच्या बातम्या-
-शिवसेना प्रवेशाच्या चर्चांवर छगन भुजबळ म्हणतात…
-…परंतू या सगळ्याला राज ठाकरे बळी पडणार नाहीत- प्रकाश आंबेडकर
-काँग्रेसला धक्का; निर्मला गावित यांचा आमदारकीचा राजीनामा
-राष्ट्रवादीत जाणार का??? नारायण राणेंचं 4 शब्दांचं उत्तर अन् पवार वेटिंगवर…!
Comments are closed.