मुंबई | उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांकडील विजेची थकबाकी सक्तीने वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर टीका केली आहे.
राज्यातील शेतकरी दुष्काळामुळे चिंताग्रस्त आहेत. त्यांना आधार देण्याऐवजी स्वतः ऊर्जामंत्र्यांनी शेतकऱ्यांकडून विजबिलाची थकबाकी वसूल करण्याच्या सूचना देत आहेत. सरकारची ही कृती म्हणजे मढ्यावरचे लोणी खाण्यासारखा प्रकार आहे, असं ट्वीट धनंजय मुंडेंनी केलं आहे.
दरम्यान, राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळ असताना वीज बील वसुलीचे आदेश निघाल्याने शेतकऱ्यांसमोर नवीन संकट उभं राहीलं आहे.
राज्यातील शेतकरी दुष्काळामुळे चिंताग्रस्त असतांना त्यांना आधार देण्याऐवजी स्वतः ऊर्जामंत्री @cbawankule शेतकऱ्यांकडील विजेची थकबाकी सक्तीने वसूल करण्याच्या सूचना देत आहेत. सरकारची ही कृती म्हणजे मड्यावरचे लोणी खाण्यासारखा प्रकार आहे. pic.twitter.com/kFwmAdsniQ
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) September 28, 2018
महत्त्वाच्या बातम्या-
-शरद पवारांवर नाराज होऊन राजीनामा दिल्याची बातमी चुकीची-सुशिलकुमार शिंदे
-अॅपलचे 3 नवीन आयफोन बाजारात, किमती पाहून थक्क व्हाल!
-… तर मंत्र्यांना नागडं करून मारू- राजू शेट्टी
-सत्तेवर आल्यापासून मोदींची इच्छाशक्ती दिसली नाही- अण्णा हजारे
-राष्ट्रवादीला आणखी एक हादरा; पवारांची डोकेदुखी वाढली
Comments are closed.