महाराष्ट्र मुंबई

“आचारसंहितेचं कारण सांगून शेतकऱ्यांना मदत नाही मात्र अधिकाऱ्यांच्या बदल्या; गौडबंगाल काय?”

मुंबई | आदर्श आचरसंहितेमुळे राज्यात भीषण दुष्काळ असतानाही शेतकऱ्यांना हवी तशी मदत करता येत नाही, असं सरकार सांगत आहे. मात्र सरकारने बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा लावलाय. हा नेमका बदल्यांचा गौडबंगाल काय? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंनी केला आहे.

मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजॉय मेहता यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी बदली करण्यात आली आहे. पण आदर्श आचारसंहिता लागू असताना देखील बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर धनंजय मुंडेंनी आक्षेप घेतला आहे.

मुख्य सचिवांची सप्टेंबरपर्यंत मुदत असताना आचारसंहिते दरम्यान घाईघाईने निर्णय घेण्याची गरज सरकारला का भासली? याचं उत्तर सरकारने जनतेला द्यावं, अशी मागणी धनंजय मुंडेंनी केली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी सातत्याने दुष्काळाच्या प्रश्नावर भाजपला लक्ष्य करत आहे.

महत्वाच्या बातम्या

-मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचे हक्काचे पाणी गुजरातला वळवले- मनसे

-आतिशी यांचा भाजपवर आक्षेपार्ह पोस्टर्स वाटल्याचा आरोप; दिल्लीच्या विद्यार्थीनींनी केला भाजपचा निषेध

-23 मे नंतर मी बारामतीत गुलाल उधळायला जाणार- चंद्रकांत पाटील

-अरविंद केजरीवालांनी माझ्यावर केलेले आरोप सिद्ध केले तर मी फासावर जाईन- गौतम गंभीर

-ऐन निवडणुकीच्या धामधुमीत प्रियांका गांधींनी मान्य केली आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या