बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘ताईसाहेब, राजकारण इतरत्र जरूर करा, पण…’; धनंजय मुंडेंचं पंकजा मुंडेंना प्रत्युत्तर

मुंबई | राज्यात ठिकठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे ऑक्सिजन, रेमडेसिव्हीर, कोरोना लस यासारख्या वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडत आहेत. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना एक पत्र लिहिलं होतं.

REMDESIVIR चा तुटवडा बीडमध्ये जाणवत आहे, आरोग्य मंत्री यांना विनंती आहे जातीने लक्ष घालून उपलब्ध करून द्यावे. राज्य सरकारला आलेल्या 2 लाख पैकी बीडलाही पुरेसे #vaccine मिळाले पाहिजेत. बीडच्या सत्ताधाऱ्यांना माफियांचे हित माहिती आहे. जनतेच्या हितासाठी आम्ही लढण्यास तयार आहोत, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला. याला धनंजय मुंडेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

ताईसाहेब मा. मुख्यमंत्र्यांना आणि मा. आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहिण्याऐवजी पूर्ण माहिती घेऊन एखादे पत्र मा. पंतप्रधानांना पाठवावं आणि लसींचा पुरवठा वाढवण्याबाबत आग्रह धरावा, जेणेकरून कोरोनाविरुद्धच्या या लढाईत खरोखरच आपली मदत होईल, असं म्हणत धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंना खडेबोल सुनावले आहेत.

जिल्ह्यात लसीकरणाचे दोन्ही कंपन्यांचे मिळून 149473 नागरीकांना पहिले तर 19732 नागरिकांना दुसरे डोस देण्यात आले आहेत.हे प्रमाण अन्य जिल्ह्याच्या सरासरीच्या तुलनेत अधिक आहे, हेही आपल्याला ज्ञात नसेलच! राजकारण इतरत्र जरूर करा,पण कृपया जिथे लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे तिथं नको, असं धनंजय मुंडेंनी म्हटलं आहे.

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत इंदापूरमध्ये काँग्रेसचा आमदार असेल- नाना पटोले

कुणाचा पगार वाढला, कुणाचा कमी?; वाचा भारतीय क्रिकेटपटूंना मिळणारा नवा पगार

“मेंदूला संसर्ग होण्यासाठी काँग्रेस नेता असणं पुरेसं असतं”

“तातडीने रेमडेसिवीर इंजेक्शन्स उपलब्ध करून द्या, अन्यथा…”

‘…तर आपण या संकटावर सहज मात करू’; राज ठाकरेंनी मानले नरेंद्र मोदींचे आभार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More