बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“चौकशीला सामोरं गेलं नाही तर मात्र अटक करायचं, तरी महाविकास आघाडी सरकार मजबूत”

बीड | महाराष्ट्रातील राजकारणात काही दिवसांपासून अनेक वेगवेगळ्या घटना घडत असताना पाहायला मिळत आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली तर अजित पवार व कुटूंबियांना आयकर विभागाची नोटीस पाठवण्यात आली होती. त्यातच राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी परळीमध्ये बोलत असताना यावरून भाजपवर शरसंधान साधलं.

अनिल देशमुखांना ईडीकडून अटक करण्यात आल्यानंतर ही अटक होणं दुर्दैवी असल्याचं धनंजय मुंडे यांनी बोलून दाखवलं आहे. तसेच अनिल देशमुख हे चौकशीला व यंत्रणांना पूर्णपणे सहकार्य करत असतानाही त्यांना अटक करणं दुर्दैवी असल्याचं आमदार रोहित पवार यांनी म्हटलं होतं.

सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर चौकश्या लावल्या जात असल्याचा आरोपही धनंजय मुंडे यांनी केला आहे.‌ तसेच भाजपने कितीही प्रयत्न केला तरी राज्य सरकार हे पूर्णपणे मजबूत आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

धनंजय मुंडे यांनी भाजप नेत्यांवर चांगलाच हल्लाबोल केला असल्याचं दिसून आलं. महाविकास आघाडीचे नेत्यांकडून भाजपवर मोठ्या प्रमाणात टीकेची झोड उठली असताना धनंजय मुंडे यांनीही या प्रकरणात उडी घेतली असून भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

थोडक्यात बातम्या

“खंजीर खुपसून स्वतःचा विकास करण्याचा मार्ग…”

“…म्हणून नवाब मलिक आणि ज्यांच्यावर आरोप केले त्या सर्वांची नार्को टेस्ट करा”

“उद्धवजी राजीनामा द्या आणि सरकार बरखास्त करा…”

महाराष्ट्राबाहेर शिवसेनेचा भगवा फडकला! दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत ऐतिहासिक विजय

यंदा पावसाप्रमाणे थंडीचाही कहर; राज्यातील ‘या’ भागांना पाऊस झोडपणार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More