बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘पंकजांचा पराभव धनंजय मुंडेंनी केला की’.., अजित पवारांचे सूचक वक्तव्य

मुंबई | राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचं नाव न घेता विधानसभा निवडणुकीत पराभव कसा झाला याबद्दल सूचक वक्तव्य केले आहे. सुधीर मुनगंटीवार यांना आपण सरकारमध्ये नाही याचे शल्य प्रचंड बोचत आहे. अर्थसंकल्पीय भाषणाला उत्तर देत असताना  अजित पवार यांनी भाजप नेत्यांना चांगलेच खडेबोल सुनावले.

सुधीर मुनगंटीवार यांनी मागील 5 वर्ष राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यांनी वेगवेगळी भूमिका मांडली आहे. अधिवेशन सुरू झाल्यापासून सुधीर मुनगंटीवार हे सरकार पडणार, सरकार बरखास्त होणार, राष्ट्रपती राजवट लागू होणार आहे, असं वक्तव्य मुनंगटीवार यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहे. मराठी मध्ये एक म्हण आहे ‘सहन ही होत नाही, सांगता ही येत नाही’ काही जणांना आपण या सरकारमध्ये नाही याचे शल्य प्रचंड बोचत आहे. त्यामुळे ते कधी नाना पटोले यांच्यावर घसरले, तर केदार यांच्यावर टीका करत होते, असा टोला अजितदादांनी यावेळी लगावला.

दरम्यान, राज्यात कृषी आणि संलग्न क्षेत्रात 11.7 टक्के वाढ झाली आहे. बळीराजाने आपल्या राज्याला वाचवले वेळेवर कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत कर्ज घेणाऱ्यांना शून्य टक्के व्याज दिले जाणार आहे. अशा शेतकऱ्यांना  हजारांचं अनुदान देण्याचा आम्ही विचार करतोय, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.

थोडक्यात बातम्या –

“सत्ता गेल्यानं अनेकांना सहन होत नाही अन् सांगताही येत नाही”

‘या’ कारणाने पतीकडून पत्नीचा निर्घृण खून; सहा महिन्यांपूर्वी झाला होता प्रेमविवाह

YouTube द्वारे पैसे कमवणाऱ्यांना गुगलचा मोठा झटका; केली ‘ही’ मोठी घोषणा

‘शेतकऱ्याची लाखमोलाची जमीन…’; नाना पटोलेंचा रामदेवबाबा अन् अंबानींना संतप्त सवाल

“सचिन वाझे ठाकरे सरकारचा जावई आहे का?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More