“धनंजय मुंडे यांच्या नोकराने जमीन हडपली”; महिलेच्या नव्या आरोपांनी खळबळ

Dhananjay Munde

Dhananjay Munde | भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे बंधू प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी गंभीर आरोप केला आहे. मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde)यांच्या नोकराने धमकावून त्यांची साडेतीन कोटी रुपयांची ६४ गुंठे जमीन केवळ २१ लाख रुपयांत हडपल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.

महाजनांचा आरोप काय आहे?

सारंगी महाजन यांच्या म्हणण्यानुसार, “मंत्री मुंडे यांचा नोकर गोविंद मुंडे याने मला धमकावले. कोऱ्या कागदावर सह्या करायला भाग पाडले. जर मी सह्या केल्या नाहीत तर मला परळीतून बाहेर काढले जाईल, अशी धमकी दिली. त्यांनी माझी जमीन हडप केली.”

गोविंद मुंडे यांच्याशी काहीही संबंध नाही

या आरोपांवर मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “गोविंद मुंडे हा माझा नोकर नाही. त्याच्याशी माझे काहीही संबंध नाही. त्याने जमीन खरेदी केल्याची मला माहिती देखील नव्हती.” (Dhananjay Munde)

महाजन यांचे आरोप बिनबुडाचे

या प्रकरणी गोविंद मुंडे यांनी देखील उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, “मी मंत्री मुंडे यांचा नोकर नाही. मी एक प्रतिष्ठित व्यापारी आहे. सारंगी महाजन यांचे आरोप बिनबुडाचे आहेत. त्या नाहक बदनामी करीत आहेत. माझ्यावर खोटे आरोप केले आहेत.”

पोलिसांनी चौकशी सुरू केली

हे प्रकरण १८ ऑक्टोबर २०२४ रोजी घडले. सारंगी महाजन यांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार केली आहे. त्यानुसार परळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. (Dhananjay Munde)

News Title : Dhananjay Munde employee accused of land grabbing
महत्वाच्या बातम्या –

चार्जिंगचं टेन्शन विसरा, आता बिनधास्त घ्या ई-कार; सरकारची मोठी घोषणा

बीड जिल्ह्यात आणखी एक धक्कादायक घटना, पोलिसानं उचललं टोकाचं पाऊल

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पात्रता फेरीतील धक्कादायक प्रकार उघडकीस

मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?

शेतकऱ्यांसाठी आले कांद्याचे नवे वाण, फक्त ‘इतक्या’ दिवसात निघणार उत्पादन!

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .