धनंजय मुंडेंच्या आमदारकीवरही टांगती तलवार?, मराठा समाज आक्रमक

Beed News

Dhananjay Munde | बीडमधील दिवंगत सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येच्या प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) याच्याशी जवळचा संबंध असल्याने धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती.

अखेर काल (4 मार्च) त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मात्र, आता मराठा समाज त्यांचा आमदारकीचाही राजीनामा आणि पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी करत आहे.

मराठा समाजाची कडवी भूमिका 

धनंजय मुंडे यांना केवळ मंत्रिपदावरून हटवणे पुरेसे नाही, तर त्यांची आमदारकीही रद्द करण्यात यावी, अशी मागणी पुण्यातील मराठा समाज बांधवांनी केली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी (Jitendra Dudi) यांना निवेदन देत सकल मराठा समाजाने मुंडेंच्या पक्षातील हकालपट्टीचीही जोरदार मागणी केली आहे.

मराठा समाजाच्या या तीव्र भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि महायुती सरकारसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे.

धाराशिवमध्ये आज बंद 

दरम्यान, संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे व्हिडीओ आणि फोटो समोर आल्यानंतर काल (मंगळवारी) बीडमध्ये बंद पाळण्यात आला होता. तर आज (बुधवार) धाराशिव (उस्मानाबाद) येथे सकल मराठा समाजाने बंदची हाक दिली आहे. यादरम्यान, धनंजय मुंडे यांना सहआरोपी करा, कृष्णा आंधळे (Krishna Andhale) याला तातडीने अटक करा, सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्या अशा मागण्या करण्यात आल्या.

बार्शी (Barshi) तालुक्यातही मराठा समाज आक्रमक झाला असून धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की, फक्त राजीनामा देऊन हा विषय संपणार नाही, तर मुंडेंना सहआरोपी म्हणून समाविष्ट केले जावे.

Title : Dhananjay Munde Faces Demand for Expulsion After Resignation

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .